राज्यात मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून धरणांमध्ये समाधानकार पाणीसाठा जमा झाला आहे. यावर्षी राज्यात 12 दिवस आधीच मान्सून दाखल झाला, राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला यामुळे धरणांतील पाणी साठ्यात वाढ झाली ही वाढ मागील वर्षीच्या पाण्यासाठ्या पेक्षा जास्त आहे. 19 जून रोजी राज्यातील धरणसाठ्यांची स्थिती मागील वर्षीच्या तुलनेत किती आहे हे जाणून घेऊया.