
Devendra Fadnavis Inauguration Forensic Van: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईल फॉरन्सिक व्हॅन्सचे लोकार्पण केले. अशा व्हॅन असणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. यामुळे कोणत्याही गुन्ह्यातील पुरावे नष्ट करणे किंवा पुराव्यांशी छेडछाड करणे थांबणार असून पुराव्यांअभावी गुन्हेगार सुटणार नाहीत तसेच गुन्हे उघडकीस येणे आणि गुन्हेगारांना शिक्षा होणे यात गुणात्मक बदल होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.