संपूर्ण देशभरासह राज्यातही उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. सरत्या 2024 वर्षाला निरोप देताना 2025 या नववर्षांच स्वागत मंगलमय वातावरणात करण्यासाठी लाखो भक्तांनी राज्यातल्या प्रमुख मंदिरांमध्ये हजेरी लावली. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीत साईबाबा, शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनाने नववर्षाचं स्वागत भाविकांनी केले. हे वर्ष सर्वांना सुख समाधान आणि निरोगी राहो अशी प्रार्थना भाविकांनी केली आहे.