Maharashtra Din : महाराष्ट्राच्या मुंबई परिसरातील हे पहिलंच इको-टुरिझम गाव, बघताच प्रेमात पडाल

या गावातची खासियत बघून अनेक पर्यटक या गावाला भेटी देतात. चला तर या ठिकाणाबाबत आज सविस्तर जाणून घेऊया
Maharashtra Din
Maharashtra Dinesakal

Maharashtra Din : मुलांना शाळेच्या सुट्ट्या असो किंवा कर्मचाऱ्यांना ऑफिसच्या सुट्ट्या असो, सुट्ट्यांमध्ये जायचे कुठे याची लांबलचक विश लिस्ट आधीच डोक्यात सेव्ह झालेली असते. यंदा महाराष्ट्रदिनी तुम्ही कुठेतरी सहलीला जाणार असाल तर तुमच्या विशलिस्टमध्ये आणखी एका ठिकाणाचं नाव अॅड करून घ्या. या गावातची खासियत बघून अनेक पर्यटक या गावाला भेटी देतात. चला तर या ठिकाणाबाबत आज सविस्तर जाणून घेऊया.

मारंबळपाडा

पालघर जिल्ह्यातील मारंबळपाडा (विरार) हे मुंबई परिसरातील पहिले इको-टुरिझम गाव ठरले आहे. वैतरणा नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर मारंबळपाडा (विरार) हे वसलेले आहे. - पालघरच्या चिखल डोंगरी गावाचा तो भाग आहे. मारंबळपाड्यात कांदळवन आणि सागरी जैवविविधता परिचय केंद्र उभारण्यात आले आहे. या परिसरातील इको-टुरिझम विकास करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. विरारपासून बोटीने कांदळवन सफारीची सुविधा उपलब्धही येथे करुन देण्यात आली आहे.

गावात पर्यटकांसाटी बोटीची विशेष सोय करण्यात आली आहे. बारा आसनी बोटीतून पर्यटकांना कांदळवनाची सुंदर झलक बघता येते. पावसाळा सोडला तर अगदी कोणत्याही दिवशी तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.

Maharashtra Din
Maharashtra Din : महाराष्ट्रातील असं एक ठिकाण, जेथे मावळ्यांच्या वंशजाचे आजही वास्तव्य

गावाची खासियत

हिरवीगार भातशेती, प्राचीन मंदिरे, खाडी आणि घनदाट कांदळवनांनी आच्छादलेले बेट यामुळे मारंबळपाडाचा भाग लगतच्या शहरी दृष्यापेक्षा पूर्णपणे वेगळा दिसतो. पर्यटकांना कांदळवनात बोटीतून सफर, निसर्ग भटकंती, पक्षी निरीक्षण, मॅन्ग्रोव्ह बोर्डवॉक, बेटाला भेट अशा अनेक अॅक्टिव्हीटीज उपलब्ध असणार आहेत. (Maharashtra Din)

याशिवाय, स्थानिक नागरिक, त्यांची संस्कृती, कांदळवन आणि अनुषंगिक जैवविविधता याबाबतच्या माहितीचे आकर्षक पद्धतीने मांडलेले प्रदर्शन केंद्रात तुम्हाला पाहायला मिळतं. सभोवतालच्या अवलोकनासाठी असलेला डेक हे केंद्राचे वैशिष्ट्य आहे. या डेकवरून मारंबळपाड्याचे ३६० अंशातील विहंगम दृश्य दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com