esakal | राज्यात 1 लाख रुग्ण कोरोनामुक्त, आज 8018 रुग्ण बरे होऊन घरी
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात 1 लाख रुग्ण कोरोनामुक्त, आज 8018 रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी 8018 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात 1 लाख रुग्ण कोरोनामुक्त, आज 8018 रुग्ण बरे होऊन घरी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी 8018 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या 1 लाख 1 हजार 172 झाली आहे. आज सर्वाधीक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळतील असून 7033 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

आज सोडण्यात आलेल्या 8018 रुग्णांमध्ये

  • मुंबई मंडळात 7033 (आतापर्यंत एकूण 72 हजार 285)
  • पुणे मंडळात 477 (आतापर्यंत एकूण 14 हजार 315)
  • नाशिक मंडळात 332 (आतापर्यंत एकूण 5602)
  • औरंगाबाद मंडळ 93 (आतापर्यंत एकूण 3214)
  • कोल्हापूर मंडळ 12 (आतापर्यंत एकूण 1556)
  • लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण 702)
  • अकोला मंडळ 31 (आतापर्यंत एकूण 1964)
  • नागपूर मंडळ 33 (आतापर्यंत एकूण 1534)

रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

क्या बात है! मुंबईत आतापर्यंत तब्बल 50694 रुग्णांची कोरोनावर मात; आज 'इतके' नवे रुग्ण.. 

29 मे रोजी राज्यात एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा तेवढ्याच विक्रमी संख्येन रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून 15 जून रोजी एकाच दिवशी 5071, 24 जून रोजी 4161 आणि  25 जून रोजी 3661 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जूनमध्ये एकाच महिन्यात 12 हजार 893 एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले.

गेल्या काही महिन्यापासून सातत्याने राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 51 ते 53 टक्क्यांच्या आसपास राहीला आहे. राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

maharashtra discharged more than one lac covid 19 patients