esakal | क्या बात है! मुंबईत आतापर्यंत तब्बल 50694 रुग्णांची कोरोनावर मात; आज 'इतके' नवे रुग्ण.. 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

मुंबईत कोरोना आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत असून आतापर्यंत 50,694 रुग्ण बरे झाले आहेत.

क्या बात है! मुंबईत आतापर्यंत तब्बल 50694 रुग्णांची कोरोनावर मात; आज 'इतके' नवे रुग्ण.. 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोना आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत असून आतापर्यंत 50,694 रुग्ण बरे झाले आहेत. आज 1554 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे  एकूण रुग्णसंख्या 80262 झाली आहे. तर 57 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतांचा आकडा 4,686 वर पोचला आहे. मात्र मुंबईत आज एका दिवसात 5903 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 

मुंबईत आज नोंद झालेल्या 57 मृत्यूंपैकी 43 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 31 पुरुष तर 26 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी चौघांं जणांचे वय 40 चयाखाली होतेे. तर 34 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 19 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.      

हेही वाचा: कौतुकास्पद! कोरोना योद्धे 'या' कामातही अग्रेसर; कोरोनाला हरवून दुसऱ्यांना देतायत जीवनदान..       

संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 798 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 55,382 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 5903 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  50,694 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 
                                                                
मुंबईत आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 63 टक्के इतका आहे. तर 1 जून पर्यंत एकूूूण 3,39,796 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 24 जून ते 30 जून दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 1.72 इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी हा 41 दिवसांवर गेला आहे.         

हेही वाचा: वाघ आणि बिबट्यांनाही लॉकडाऊनचा फटका; मांसाहारी प्राण्यांच्या नशिबी फ्रोजन मटण..

मुंबईत 754 सक्रिय कंटेन्मेंट झोन असून आतापर्यंत 6253 इमारती सीलबंद करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 9172 अति जोखमीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून सीसीसी 1 मध्ये 13,458 अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. तर आतापर्यंत संस्थेमध्ये 1,14,111 लोकांचे अलगीकरण करण्यात आले आहे.

50 thousand corona patients cured in mumbai 

loading image
go to top