Driving Licence Rules : ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नियम बदलणार; बाईक, टॅक्सीसाठी १ ऑगस्टपासून अंमलबजावणीची शक्यता

Driving Licence New Rules : राज्यात १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाइल प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. बाईक टॅक्सी सेवांसाठीही नवे नियम लागू होण्याची शक्यता असून परिवहन विभागाने महत्त्वाची घोषणा केली आहे.
Driving Licence Rules maharashtra

Driving Licence Rules maharashtra

esakal

Updated on

Maharashtra Transport News : राज्यातील ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी तसेच बाईक टॅक्सी सेवेला कायदेशीर चौकट उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी डोमिसाइल प्रमाणपत्र अनिवार्य करण्याबरोबरच बाईक टॅक्सी सेवेसाठी स्वतंत्र नियमावली लागू करण्याची तयारी सुरू असून, आवश्यक मंजुरीनंतर हे नियम १ ऑगस्टपासून लागू होण्याची शक्यता असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मंगळवारी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com