marathwada drought cm devendra fadnavis
sakal
पावसाने ओढ दिल्यानं राज्यातील अनेक भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला असून पिके करपली आहेत. या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांसह विरोधकांनी केलीय. दुष्काळासंदर्भात आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. राज्यात दुष्काळाची पहिली अधिसूचना शनिवारपर्यंत काढणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.