Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

Revenue Division-Wise List of Drought-Affected Talukas : राज्यात २६५ तालुके दुष्काळग्रस्त; Trigger 1 लागू झालेल्या तालुक्यांना जमीन महसुलात सूट, कर्जवसुली स्थगिती, वीजबिल सवलतीसह विविध उपाययोजना
Drought-affected farmland in Maharashtra, symbolizing the declaration of drought in 265 talukas under Trigger 1 during the Kharif 2026 seaso

Drought-affected farmland in Maharashtra, symbolizing the declaration of drought in 265 talukas under Trigger 1 during the Kharif 2026 seaso

esakal

Updated on: 

मुंबई : खरीप हंगाम २०२६ मध्ये राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांमध्ये प्रथम कळ म्हणजेच Trigger 1 लागू झाल्याची माहिती शासन निर्णयातून समोर आली आहे. या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भाग म्हणून समावेश करण्यात आला असून, संबंधित तालुक्यांसाठी विविध सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत. शासन निर्णयावर २६ सप्टेंबर २०२६ रोजी स्वाक्षरी करण्यात आली आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्यांना विविध सवलती

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना विविध सवलतींचा लाभ मिळणार आहे. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती यांचा समावेश आहे. तसेच ७.५ हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषीपंपांचे वीजबिल आधीच माफ करण्यात आले असून, त्यावरील क्षमतेच्या कृषीपंपांना चालू वीजबिलात सूट लागू राहणार आहे. याशिवाय टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com