

Drought in Maharashtra solapur latur
esakal
Farmer Death Latur and Solapur : पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा शेतीवर परिणाम होत असतानाच कर्जबाजारीपणाच्या वाढत्या आर्थिक ताणातून शेतकरी कुटुंबांसमोरील संकट अधिक गडद होत आहे. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यात एका अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात कर्ज आणि नापिकीमुळे विषारी कीटकनाशक प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या सलग घटनांमुळे दुष्काळाच्या झळा आणि शेतीतील आर्थिक संकट पुन्हा अधोरेखित झाले आहे.