राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात बांधकाम क्षेत्राचा ठसा

राज्याचा विकास दर राहणार १२ टक्के
construction worker
construction workerconstruction-worker
Updated on

नवी दिल्ली : राज्याचा अर्थसंकल्प उद्या (शुक्रवार) विधीमंडळात सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल २०२१-२२ गुरुवारी प्रसिद्ध झाला. या अहवालात राज्याच्या आर्थिक वाढीचा दर १२.१ टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक वाढ बांधकाम क्षेत्रात अपेक्षित आहे. (Maharashtra economic growth rate will be twelve percent Estimates in Financial Survey Report)

construction worker
चार राज्यातील भाजपच्या विजयावर विरोधकांची भूमिका काय? शरद पवार म्हणतात...

आर्थिक अहवालातील माहितीनुसार, यंदा राज्याच्या आर्थिक विकासाचा दर २१.१ टक्के राहण्याचा अंदाज तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्के वाढ अपेक्षित आहे. ही वाढ २०२१-२२ मधील घटीच्या पार्श्वभूमीवर आहे. यामध्ये सर्वात कमी ४.४ टक्के वाढ कृषी व संलग्न कार्यांसाठी अपेक्षित आहे. तर उद्योग क्षेत्रात ११.९ टक्के तर सेवा क्षेत्रात सर्वाधिक १३.५ टक्के वाढ अपेक्षित आहे. तसेच वस्तुनिर्माण आणि बांधकाम क्षेत्रात अनुक्रमे ९.५ टक्के आणि १७.४ टक्के अहवाल अपेक्षित आहे.

दरम्यान, पूर्वानुमानानुसार राज्याचं सांकेतीक स्थूल उत्पन्न ३१,९७,७८२ कोटी रुपये अपेक्षित आहे. तर वास्तविक स्थूल उत्पन्न २१,१८,३०९ कोटी रुपये राहणं अपेक्षित आहे. सांकेतिक स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा सर्वाधिक १४.२ टक्के आहे. तर सन २०२१-२२ च्या पूर्वानुमानानुसार राज्याच दरडोई उत्पन्न २,२५,०७३ रुपये राहणं अपेक्षित आहे. तर विकास खर्चाचा एकूण महसुली खर्चाचा हिस्सा ६८.१ टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com