चार राज्यातील भाजपच्या विजयावर विरोधकांची भूमिका काय? शरद पवार म्हणतात... | Sharad Pawar Reaction on BJP Win | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar reaction on election
चार राज्यातील भाजपच्या विजयावर विरोधकांची भूमिका काय? शरद पवार म्हणतात...

चार राज्यातील भाजपच्या विजयावर विरोधकांची भूमिका काय? शरद पवार म्हणतात...

मुंबई : देशात पाच पैकी चार राज्यात भाजपचा (BJP) विजय झाला आहे, यावर विरोधकांची भूमिका स्पष्ट करताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, मला असा विश्वास वाटतो की देशात भाजपविरोधात प्रादेशिक पक्ष मोठ्या संख्येत एकत्र येतील. तेलंगणा, आंध्र, केरळ, तामिळनाडू किंवा पश्चिम बंगाल, राजस्थान अशा काही राज्यांमध्ये भाजपशिवाय राजकीय पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत. यावर विरोधकांना पुन्हा एकत्र येऊन चर्चा करावी लागेल. (What is the role of opposition in BJP victory in four states Sharad Pawar says)

हेही वाचा: पाच राज्यांच्या निकालांवर शरद पवारांचं भाष्य; आम आदमी पक्षाचं केलं कौतुक

देशाला एक पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रम देण्यासाठी काही चर्चा होऊ शकते. ती पुन्हा सुरु करावी लागेल, आता १४ तारखेपासून संसदेचं अधिवेशन सुरु होतंय. या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन चर्चा करु आणि पुढील रणनीती ठरवू. विरोधकांबरोबर येताना देशातील एक महत्वाचा राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला निर्णय घ्यावा लागेल. अनेक वर्षापासून ते देशात काम करत आहेत. त्यामुळं त्यांना न विचारता किंवा चर्चा करता त्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही, असंही यावेळी पवार म्हणाले.

काँग्रेसच्या खराब कामगिरीवर शरद पवार म्हणाले...

राजकीय जीवनात कधी ना कधी अशी स्थिती येतेच. १९९७ मध्ये सर्व राज्यांमध्ये काँग्रेस निवडणूक हारली होती. यावेळी अनेकांनी म्हटलं की, काँग्रेस संपली पण तसं झालं नाही. पण पक्षाचं नेतृत्व आणि फिल्डवर काम करणारा कार्यकर्ते ते मजबुतीने आपलं संघटनं पुढे नेण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरतं तर लोक त्यांना स्विकारतात. १९७७ मध्ये जनतेनं काँग्रेसवर बहिष्कार घातला त्यानंतर १९८० मध्ये काँग्रेसच्या हातातच सत्ता दिली. याकडे आपण दुर्लक्ष करु शकत नाही. पण सध्या पाच राज्यात भाजपला जे यश मिळालंय ते आपण स्विकारलं पाहिजे, अशा शब्दांत शरद पवारांनी काँग्रेसच्या खराब कामगिरीवर भाष्य केलं.

Web Title: What Is The Role Of Opposition In Bjp Victory In Four States Sharad Pawar Says

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sharad PawarBjpDesh news