Teachers Asked To Count Dogs Sparks Controversy In Maharashtra
Esakal
महाराष्ट्र बातम्या
शिक्षणाधिकाऱ्यांचाच अभ्यास कच्चा, आदेशाचा चुकीचा अर्थ काढला; राज्यात शिक्षकांना दिल्या कुत्रे मोजण्याच्या सूचना
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना कुत्र्यांची संख्या मोजण्याच्या सूचना दिल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.
मुंबई, ता. ६ : श्वान उपद्रवाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर काढलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला. त्यामुळे अनेक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांवर थेट कुत्रे मोजण्याची जबाबदारी टाकली. स्थानिक पातळीवर पत्रे काढल्याने राज्यभर गोंधळ निर्माण झाला असून, या प्रकाराबाबत शिक्षण क्षेत्रातून तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

