

डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच राज्यात हवामानात मोठा बदल जाणवू लागला आहे. थंडीचा कडाका वाढला असून यंदाच्या हिवाळ्यात (डिसेंबर ते फेब्रुवारी) महाराष्ट्र अधिकच गारठणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा महाराष्ट्र अधिकच गारठणार असून, विदर्भ, मराठवाड्यात थंडीच्या लाटा अधिक दिवस टिकून राहण्याचा तिमाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.