marathwada drought cm devendra fadnavis
sakal
अल निनोमुळे पावसाचं कमी प्रमाण, अनेक भागात कमी पर्जन्यमान यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. कमी पावसामुळे धरणातील पाणीसाठा कमी असल्यानं राज्य सरकारने उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील जलस्रोतांमधील पाण्याचं ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत नियोजन करण्यासाठी शासन निर्णय जारी केला आहे.