Maharashtra Ahilyadevi Holkar Farm Loan Waiver second list 2026
esakal
मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’अंतर्गत गुरुवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१ हजार ९०० शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध (Maharashtra Farm Loan Waiver) केली. दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असलेल्या या शेतकऱ्यांसाठी ५३३ कोटी रुपयांची कर्जमाफी प्रस्तावित करण्यात आली असून, ही यादी अंतिम पडताळणीसाठी अधिकृत पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.