
marathwada rain
esakal
मराठवाडा पावसाने पुरता उद्ध्वस्त झाला आहे, मात्र पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. शेतकरी हंबरडा फोडतोय, तरीही पाऊस तेवढ्याच वेगाने कोसळतोय. हा रुद्रावतार पाहून शेतकरी हतबल झाला आहे. ज्या भागात वर्षानुवर्षे दुष्काळ पडतो, त्याच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. निसर्गाचे चक्र फिरले आणि त्याने थेट पिकं उध्वस्त केली. शेतात मातीऐवजी खडक दिसत आहेत. पाच वर्षांपासून मशागत केलेल्या मोसंबीच्या बागा नष्ट झाल्या. डोळ्यासमोर भयानक वास्तव उभे आहे, तरी सरकार पंचनाम्याच्या गप्पा मारते. सरकार बांधावर येऊन धीर देते, पण स्वाभिमानी शेतकऱ्याचे मन आतून तुटत आहे. अनेक शेतकरी जीवन संपवत आहेत. काल यवतमाळ जिल्ह्यात एका युवा शेतकऱ्याने आपले जीवन संपवले.