Maharashtra Farmer Loan Waiver : कर्जमाफीसाठी तूर्तास १५ हजार कोटीच, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना धक्का, प्रोत्साहनपर अनुदानाचा निधी लांबणीवर?

Crop Loan Relief : पात्र शेतकऱ्यांची ‘ग्रीन लिस्ट’ तयार करून अधिवेशनात निधी मंजुरीचा प्रस्ताव येणार. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना मिळणारे प्रोत्साहन अनुदान डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
Farmer

Farmer

esakal

Updated on

राज्य सरकारने ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली असली, तरी पहिल्या टप्प्यात केवळ १५ हजार कोटींचाच निधी मिळण्याची शक्यता आहे. सहकार व वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या केवळ थकीत पीक कर्ज असलेल्या आणि कर्जपुरवठा खंडित झालेल्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिले जात असून, त्यांच्या ‘ग्रीन लिस्ट’साठी येत्या अधिवेशनात तरतूद केली जाईल. तर दुसरीकडे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानाचा निधी थेट डिसेंबरमधील अधिवेशनापर्यंत लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com