
वसई (बातमीदार) : राज्यभरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पालघर जिल्ह्यातही पावसाची तुफान एन्ट्री झाली आहे. या जिल्ह्यात सकाळी ५ ते ८ दरम्यान झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले पीक वाहून गेले. यात आंबा , चिकू, उन्हाळी भात तसेच भाजीपाला लागवडीचे नुकसान झाले.