
महाराष्ट्रात तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. ही केवळ आकडेवारी नाही, तर ७६७ कुटुंबांचा उध्वस्त झालेला संसार आहे. शेतकऱ्यांचे हे दुख: आणि त्यांचा आक्रोश महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेला आहे. पण सरकार? ते आपल्या जनसंपर्काच्या (PR) तमाशात मग्न आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.