महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने नमो शेतकरी योजनेअंतर्गत पैसे जमा केल्यानंतर आता राज्य सरकारनेही शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपयांचा हप्ता जमा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, राज्यातील ९१ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली असून, शेतकऱ्यांनी आपले खाते तपासण्याचे आवाहन सरकारने केले आहे.