Crop Insurance : राज्यात ६४ लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटींची भरपाई; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती

Farmers Welfare : महाराष्ट्रातील ६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,५५५ कोटी विमा भरपाई जमा होणार आहे. राज्य सरकारने प्रलंबित ₹२,८५२ कोटी अनुदानाला मंजुरी दिली, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.
Crop Insurance
Crop InsuranceSakal
Updated on

मुंबई : राज्यातील जवळपास  ६४ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार ५५५ कोटी   रुपयांची विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. राज्य सरकारने  विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून  २ हजार ८५२ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी दिली. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे कधी पासून जमा होणार याची तारीख अद्याप निश्चित नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com