दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये पाठवणार, आणखी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Meeting: राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना दिवाळीआधी अग्रीम मदत म्हणून ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.
CM Fadnavis

CM Fadnavis on Cabinet Meeting

Esakal

Updated on: 

Cabinet Meeting Maharashtra: राज्याची मंत्रिमंडळ बैठक आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. सुरुवातीला २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता. त्यात आता आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तसंच शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळी आधी अग्रीम मदत म्हणून दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ हजार रुपये पाठवले जाणार आहेत असंही त्यांनी सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com