esakal | Maharashtra: पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटी; राज्य सरकारचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

पूरग्रस्त

पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटी; राज्य सरकारचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली.

‘सह्याद्री’ येथे झालेल्या या बैठकीमध्ये पूरग्रस्तांना भरपाई देण्याचा विषय ऐनवेळी चर्चेला आला. राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाने तो एकमुखाने मंजूर केला. ही मदत कशापद्धतीने दिली जावी, याबाबत मदत व पुनर्वसन विभाग लवकरच शासन निर्णय काढणार आहे.

हेही वाचा: मुंबई : पदोन्नतीमधील आरक्षणासाठी शपथपत्र; चर्चेनंतर निर्णय

राज्यात जून महिन्यांपासून अवकाळी पावसाने लाखो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अजूनही राज्यात पाऊस पडत आहे. आणखी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ऐनवेळचा निर्णय

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची अवस्था सध्या दयनीय आहे. त्यांच्या भावनेचा उद्रेक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होऊ नये, याची दखल घेताना आज मंत्रिमंडळ बैठकीत मदत देण्याचा विषय अचानक आल्याचे सांगण्यात आले. मदत व पुनर्वसन खात्याला अंधारात ठेवून अचानकपणे हा निर्णय घेतल्याचे या विभागाचे म्हणणे आहे.

loading image
go to top