

Maharashtra Flood Relief
Sakal
मुंबई : राज्यात सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी तीन हजार २५८ कोटी रुपयांची मदत वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात पुराने बाधित २३ जिल्ह्यातील ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांच्या २७ लाख ५९ हजार ७५४.७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीसाठी ही मदत असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.