Maharashtra may take strict MCOCA action against food adulterers
esakal
दूध, पनीर आणि इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर आता सरकार कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. अशा भेसळखोरांवर केवळ अन्नभेसळीचा गुन्हा न दाखल करता, परिस्थितीनुसार मकोका अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.