

Tukaram Mundhe
esakal
नांदेड: राज्यात अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांंविरोधात सुरू केलेल्या कठोर मोहिमेचा परिणाम आता बाजारपेठेतही दिसून येत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे.