अनिल देशमुखांची ED कोठडी आज संपणार; जामीन की CBI कारवाईची टांगती तलवार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh

अनिल देशमुखांची ED कोठडी आज संपणार; CBI कारवाईची टांगती तलवार?

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : मुंबई हायकोर्टानं (mumbai high court) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) यांना 12 नोव्हेंबरपर्यंत सुनावलेली ईडी कोठडी (ED custody) आज संपणार आहे. त्यामुळे देशमुखांना आता जामीन मिळणार का? हे आज समजणार आहे.

CBI कडून देशमुखांवर कारवाईची शक्यता

अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत शनिवारी 6 नोव्हेंबरला संपल्यानंतर पीएमएलए सत्र न्यायालयानं अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, ईडीनं देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीला आव्हान दिलं होतं. हायकोर्टानं अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. दरम्यान आजच्या सुनावणीनंतर अनिल देशमुख सध्या ईडी कोठडीत असून ईडीनंतर सीबीआय कडून देखील अनिल देशमुखांवर कारवाई करण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: काँग्रेस आमदाराच्या मुलाची आत्महत्या; सुसाइड नोट सापडली

परमबीर सिंग यांचा खळबळजनक आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

हेही वाचा: MSRTC Strike : परिवहन महामंडळाचे तब्बल 126 कोटी रुपयांचे नुकसान

loading image
go to top