पवार, ठाकरेंच्या फोन टॅपिंग चौकशीसाठी समितीची स्थापना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सरकारने अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि राज्य गुप्तवार्ताचे जॉईंट कमिश्नर अमितेश सिंह यांची समिती गठीत केली आहे. ही समिती या प्रकरणाची चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहे.

मुंबई : विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप होत असल्याच्या आरोपांच्या चौकशीप्रकरणी राज्य सरकारने दोन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे आता यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप नुकताच झाला होता. विरोधकांचे फोन टॅप करणे, त्याहीपेक्षा भयानक प्रकार म्हणजे स्नूपिंग करणे हा आहे. ही एक प्रकारची विकृतीच आहे, असा आरोप गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे प्रत्युत्तर दिले होते. अखेर सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सरकारने अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंह आणि राज्य गुप्तवार्ताचे जॉईंट कमिश्नर अमितेश सिंह यांची समिती गठीत केली आहे. ही समिती या प्रकरणाची चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra government appoints committee for phone tapping issue