

मुंबई : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) आराखडा महायुती सरकारने मागच्या कारकिर्दीत तयार केला होता. मात्र रस्त्यांसह अन्य कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना वसाहती वसवणे योग्य नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याच सरकारने आधी तयार केलेला हा आराखडा बुधवारी रद्द केला आहे.