
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्यास त्या महिलेचा लाभ कसा बंद करायचा, हे आता राज्य सरकारपुढचे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवकावर याची माहिती देण्याची जबाबदारी देण्याचा शासन विचार करीत आहे.