गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी! 'टोलमाफी'बाबत सरकारनं घेतला मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी जारी केला आदेश

हाच पास परतीच्या प्रवासाकरीताही ग्राह्य धरण्यात येईल.
Konkan Ganeshotsav Eknath Shinde
Konkan Ganeshotsav Eknath Shindeesakal
Updated on: 
Summary

मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गसह इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात (Konkan Ganeshotsav) जाणाऱ्या गणेशभक्तांना १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गसह इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते.

Konkan Ganeshotsav Eknath Shinde
Gokul Dudh Sangh : धनंजय महाडिकांच्या सासऱ्याकडे आधी ठेका होता, त्यांनी एवढे दिवस काय केले? 'गोकुळ' अध्यक्ष डोंगळेंचा सवाल

त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे. या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२३, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरूपाचे पास परिवहन विभाग, वाहतूक पोलिस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.

Konkan Ganeshotsav Eknath Shinde
Sangli Bank : सांगली बँकेच्या सर्वसाधारण सभेत ठसकेबाज लावणी अन् शिट्या..; गाण्यांच्या कार्यक्रमामुळे वादाला फुटले तोंड

हाच पास परतीच्या प्रवासाकरीताही ग्राह्य धरण्यात येईल. पोलिस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli ST 1519 special bus trips Ganesh festival
Chiplun CNG queue
Konkan Railway Latest News
ST bus
Marathi News Esakal
www.esakal.com