

Land Survey
ESakal
महाराष्ट्रातील नागरिकांना आता भूमापनासाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही. जमिनीसंबंधीची प्रकरणे अचूकपणे, जलद आणि पारदर्शकपणे सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित, परवानाधारक खाजगी भूमापक आणि एजन्सी नियुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेला मंजुरी दिली आहे.