सरकारने जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याचे दूध अनुदानाचे प्रस्ताव घेतल्यानंतर १७९ कोटी दूध अनुदान वाटप केले. अद्याप ११ कोटी बाकी आहेत.
निरगुडसर : सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Milk Producer) जाहीर केलेल्या जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या अनुदानाचे ११ कोटी थकवले, तर ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचा अनुदानाचा एक रुपया सुद्धा शेतकऱ्याला (Farmers) अद्याप मिळाला नाही, त्यामुळे हे सरकार खरंच शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे की नुसतं निवडणूक आली की दाखवलं गाजर, घेतली मतं आणि सोडलं वाऱ्यावर.. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना रखडलेले अनुदान द्याच, पण दुधाला कायमस्वरूपी हमीभाव मिळणे गरजेचे आहे.