Maharashtra : इथेनॉल धोरण ठरविण्यासाठी समिती गठीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ethanol

Maharashtra : इथेनॉल धोरण ठरविण्यासाठी समिती गठीत

माळीनगर (जि.सोलापूर) : इथेनॉल विषयक इथेनॉल निर्मिती व त्याची अंमलबजावणी याचे धोरण ठरविण्यासाठी राज्य सरकारने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे. दोन महिन्यात या समितीला शासनास अहवाल सादर करावा लागणार आहे.

हेही वाचा: "काश्मीरसाठीचा ८० टक्के पैसा राजकारण्यांच्या खिशात"

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात नाबार्डचे अध्यक्ष व नाबार्डच्या मुख्यालयातील अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा झाली होती. त्यावेळी राज्यात इथेनॉल धोरण ठरविण्याबाबत तसेच साखर कारखान्यांकडून शंभर टक्के इथेनॉल उत्पादन करण्याबाबतचा मुद्दा नाबार्डच्या अध्यक्षांनी उपस्थित केला होता. त्याअनुषंगाने सहकार विभागाने इथेनॉल धोरण ठरवावे,असे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुख्य सचिवांनी निर्देशित केले होते. त्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. राज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, 'विस्मा'चे अध्यक्ष बी.बी ठोंबरे, व्हिएसआयच्या मद्यार्क तंत्रज्ञान व जैव इंधन विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. एस.व्ही पाटील, साखर सहसंचालक (उपपदार्थ) संजय भोसले यांचा समावेश समितीत आहे.

हेही वाचा: "अमेरिकी कंपन्यांकडून भारताच्या आर्थिक सुधारणांचं कौतुक"

केंद्र सरकार व ऑईल मार्केटिंग कंपनी यांचे इथेनॉल निर्मिती व पुरवठा याबाबतचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने साखर कारखाने व आसवणी प्रकल्प यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे, केंद्र सरकारप्रमाणे राज्य शासनाचे इथेनॉल निर्मिती व पुरवठ्याबाबत धोरण निश्चित करणे, राज्यातील साखर कारखाने व आसवणी प्रकल्प यांची क्षमता वाढ करून पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी आवश्यक आराखडा तयार करणे, याबाबतची कामे या समितीला पार पाडावी लागणार आहेत.

Web Title: Maharashtra Government Five Member Committee Sugar Commissioner Shekhar Gaikwad Decide Police Ethanol Production

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top