mohan bhagwat
mohan bhagwatesakal

"काश्मीरसाठीचा ८० टक्के पैसा राजकारण्यांच्या खिशात"

कलम ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरचा विकास झाल्याचं मोहन भागवत म्हणाले.
Published on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काश्मीरच्या विकासावर भाष्य केलं आहे. तसेच कलम ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरची प्रगती झाल्याचं ते म्हणाले.

काश्मीर खोऱ्यासाठी आलेल्या ८० टक्के फंडाचं कायं झालं. तो राजकीय नेत्यांच्या खिशात गेला आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत हे पैसे पोहोचले नाही. आता काश्मीर खोऱ्यातील लोकांना विकासाचा थेट लाभ मिळत आहे. याचा अनुभव सर्वसामान्य घेत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात हे वक्तव्य केले आहे.

मी जम्मू -काश्मीरला भेट देऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली. कलम 370 रद्द केल्यानंतर खोऱ्यात सर्वांसाठी विकासाचा मार्ग खुला झाला आहे. कलम 370 मुळे जम्मू आणि लडाखमध्ये पूर्वी भेदभाव करण्यात येत होता. तो भेदभाव आता अस्तित्वात नाही, असे मोहन भागवत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com