

Aadhaar Invalid for Delayed Birth–Death Certificates
esakal
मुंबई : महाराष्ट्र सरकारने जन्म व मृत्यू नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल करत आधार कार्डाला पूर्णपणे अवैध ठरवले आहे. आता कोणत्याही परिस्थितीत जन्म किंवा मृत्यू दाखल्यासाठी आधार कार्ड हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. शिवाय, ऑगस्ट २०२३ मध्ये जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यात झालेल्या दुरुस्तीनंतर केवळ आधार कार्डच्या आधारे देण्यात आलेली सर्व जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करण्यात येणार आहेत. हा निर्णय बनावट प्रमाणपत्रांच्या मदतीने होणाऱ्या बेकायदेशीर कामांना आळा घालण्यासाठी घेण्यात आला आहे.