पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट लवकरच कमी करणार; शिंदेंची मोठी घोषणा

eknath shinde
eknath shinde Sakal

मुंबई : राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भाषणादरम्यान जोरदार भाषण केले. आभार भाषाणादरम्यान, नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडाकेबाज भाषण केले. यावेळी शिंदे यांनी सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या दोन मोठ्या घोषणा केल्या. (Eknath Shinde On Petrol Diesel Vat)

शिंदे म्हणाले की, शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावलेंने (Bharat Gogawale) हिरकणी गाव (Hirkani Village) वाचवण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित गाव वाचवण्यासाठी शासनातर्फे 21 कोटींच्या निधीची घोषणा केली. याशिवाय लवकरच पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करून सामान्यांना दिलासा देणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या काळात सामान्य जनतेला दिलासा मिळणार असल्याचे शिंदे म्हणाले.

eknath shinde
मविआ सरकारमध्ये मी CM होणार होतो पण, अजित पवार...; एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

शिंदे म्हणाले की, जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय कर कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशातील काही राज्यांनी काही प्रमाणात व्हॅट कमी केला होता. मात्र, आपल्या राज्याने एक पैशाचाही व्हॅट कमी केला नव्हता. परंतु, राज्यात नव्याने अस्तित्त्वात आलेले युतीचे सरकार लवकरच यावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेईल आणि महागाईने त्रस्त सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम करेल, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.

राज्यातील हे सरकार बाळासाहेबांच्या विचारांचे असून, सर्वांना योग्य निधी दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत सर्वसामान्यांचे हे सरकार आहे. गेल्या 10 दिवसांत आम्हाला भाजीवाला, रिक्षावाला अशा अनेक बिरुदावलींनी हिणवलं गेलं असे म्हणत केंद्रातील मोदी सरकार बाळासाहेबांचा अजेंडा चालवत असल्याचं शिंदे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com