

Mahrashtra Government: शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे जनता हैराण झालेली असताना महापालिका कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरत आहेत. कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण निर्बिजीकरण हा एक उपाय असला तरी भटक्या कुत्र्यांना खाद्य देणारेही तितकेच दोषी असल्याने आता यापुढे भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महानगर पालिका, नगर परिषद आणि पंचायतींना दिले आहेत. विषेश म्हणजे महापालिकांनी पकडलेल्या कुत्र्यांचे लसीकरण करुन त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी न सोडता, विशेष निवार केंद्रात सोडण्यात यावेत असे,निर्देश देण्यात आले आहेत.