Maharashtra Covid restrictions News | राज्याच्या निर्बंधमुक्तीत नेमकं काय? वाचा काय आहेत निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unlock, Maharashtra govt decision on Covid restrictions, Maharashtra Covid restrictions News

राज्याच्या निर्बंधमुक्तीत नेमकं काय? वाचा काय आहेत निर्णय

मुंबई : राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध एकमतानं हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, उद्यापासून (दि. 1) राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, निर्बंधमुक्तीमुळे नागरिकांना कोणकोणत्या गोष्टींचा फायदा होणार आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. (Maharashtra govt decision on Covid restrictions News)

  • महाराष्ट्रभरात सर्वधर्मीयांचे सर्व उत्सव निर्बंधमुक्त असतील, यात्रा-जत्रा धुमधडाक्यात साजरी करण्यास परवानगी.

  • सोशल डिस्टन्सिंगपासून मुक्ती मिळाल्याने लग्नकार्य आणि इतर कार्यक्रमांना उपस्थितीच्या संख्येवर बंधन नाही.

  • निर्बंधांमुळे उद्योग आणि व्यवसायांवर आलेली बंधनं हटवण्यात आली असून, यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे.

  • आगामी काळात येणाऱ्या उत्सवांमधील शोभायात्रांमध्ये कोणतीही आडकाठी नाही. रमजानलाही मिरवणुका काढण्याची मुभा देण्यात आली आहे.

हेही वाचा: अखेर 736 दिवसांनी महाराष्ट्र मास्कमुक्त; आरोग्य मंत्री राजेश टोपे

  • गुढीपाडवा शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणत्याही निर्बंधांशिवाय साजरी करता येणार

  • केंद्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती आणि सोसल डिस्टन्सिंग कायम असेल. मात्र महाराष्ट्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती नसेल, मास्क लावणे ऐच्छिक असेल.

  • हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थामधील उपस्थिवर मर्यादा नाही.

  • लग्न किंवा कौटुंबिक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितींवर मर्यादा नाही.

Web Title: Maharashtra Government Take Back All Covid Restriction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top