
अखेर 736 दिवसांनी महाराष्ट्र मास्कमुक्त; आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध एकमतानं हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, उद्यापासून (दि. 1) राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी मास्कबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सर्व कोरोना निर्बंध हटवण्याबरोबरच उद्यापासून मास्क वापरण्याची सक्तीदेखील मागे घेण्यात आली आहे. ज्या नागरिकांना मास्क वापरायचा आहे त्यांनी वापरावा असे ते म्हणाले. त्यांच्या या माहितीमुळे तब्बल 736 दिवसांनी सर्वच नागरिकांची मास्कपासून मुक्ती झाली आहे. राज्य सरकारकडून जरी मास्कमुक्तीची घोषणा करण्यात आली असली तरी, तो वापरायचा की नाही हा निर्णय ऐच्छिक असल्याचे टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले. (Mask free Maharashtra latest news)
हेही वाचा: राज्याच्या निर्बंधमुक्तीत नेमकं काय? वाचा काय आहेत निर्णय
दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वीच गुढीपाडव्यासाठी निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते. त्यानंत आज पार पडलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ज्यांना मास्क वापरायचा आहे त्यांनी वापरावा, तुमच्या सुरक्षेसाठी मास्कचा वापर करा असेही आवाहन टोपे यांनी केले आहे. याआधी मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाी करत दंड आकारला जात होता. मात्र, आता मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांची कारवाईपासून सुटका झाली आहे.
Web Title: No Mask Needed In Maharashtra Says Helath Minister Rajesh Tope
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..