
मुंबई : राज्यात गाजत असलेल्या पीक विमा गैरव्यवहारात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात (२०२४) पीक विम्यासाठी दाखल झालेले तब्बल चार लाख पाच हजार बनावट अर्ज रद्द करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. यातील एक लाख नऊ हजार २६४ अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यातील आहेत. तसेच बहुतांश बनावट अर्ज ज्या ९३ महा-ई-सेवा केंद्रामधून भरले, त्यांची मान्यता रद्द करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश कृषी विभागाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.