
Maharashtra Government: केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आणि GST प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा तपासणी नाके कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आंतरराज्य वाहन वाहतूक अधिक सोपी होईल आणि व्यावसायिक वाहनांना येणारे अडथळे दूर होतील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.