IAS Transfers : राज्यातील सहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra IAS Transfers

IAS Transfers : राज्यातील सहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा सविस्तर

मुंबईः शिंदे-फडणीस सरकारने राज्यातील बड्या सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये अनेक गाजलेल्या अधिकाऱ्यांच्या समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर आज सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

हेही वाचाः जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

यामध्ये सैनिक कल्याण संचालक, पुणे राजेश पाटील यांची सहव्यवस्थापकीय संचालक सिडको, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.

हेही वाचा: Winter Session 2022 : ''लोकशाहीच्या गप्पा मारणारे सभागृहात ४६ मिनिटं होते'' फडणवीसांनी काढले वाभाडे

अश्विन ए. मुद्गल (सह व्यवस्थापकीय संचालक सिडको, नवी मुंबई) यांना महानगर आयुक्त एमएमआरडीए, मुंबई म्हणून नियुक्ती देण्यात आलीय.

अजय अण्णासाहेब गुल्हाने यांची नागपूर स्मार्ट सिटी सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर दीपक सिंगला यांची अतिरिक्त आयुक्त पीएमआरडीए म्हणून नियुक्ती करण्यात आली

भाग्यश्री बानायत यांना नाशिक येथे अतिरिक्त मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आलीय. तर डॉ. इंदुराणी जाखर यांची वर्णी एसएव्हीआयएसच्या व्यवस्थापकीय संचालकपदी लागली आहे.