महाराष्ट्रातील आरोग्य विभागात ५,२२३ नव्या पदांची मेगाभरती! अनेक जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये जागा भरणार; कुठे आणि कधी?

Maharashtra Hospital Job Vacancy: महाराष्ट्र सरकारने २५९ आरोग्य संस्थांसाठी ५,२२३ नवीन पदे आणि ₹३२०.०१ कोटींच्या वार्षिक खर्चाला मंजुरी दिली आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आरोग्य सेवा आणि रुग्णसेवेत सुधारणा होईल.
Maharashtra Hospital Job Vacancy

Maharashtra Hospital Job Vacancy

ESakal

Updated on: 

महाराष्ट्र सरकारने राज्यातील आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, ज्या २५९ नवीन आणि श्रेणीसुधारित आरोग्य संस्थांचे बांधकाम ५० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. त्यांमध्ये ५,२२३ नवीन पदांच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे. या पदांसाठी ₹३२०.०१ कोटींच्या वार्षिक खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ठाणे, नाशिक, बीड, अकोला, पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसह अनेक जिल्ह्यांमधील रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com