Ajit Pawar : राज्य सरकार ८० हजार कोटींचं कर्ज काढणार; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अर्थमंत्र्यांची माहिती

विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेऊन सरकारवर ताशेरे ओढले. त्याला सत्तारुढ पक्षाने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं दिली
 Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

नागपूरः राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेऊन सरकारवर ताशेरे ओढले. त्याला सत्तारुढ पक्षाने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं दिली. शिवाय अधिवेशनासंबंधी सर्व माहिती दिली आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलेला आहे. परंतु चहापान हे निमित्त असतं, त्यानिमित्त चर्चा करुन कोणत्या विषयाला वेळ दिला पाहिजे, कोणता विषय जास्त महत्त्वाचा आहे यावर बोलणी होत असते. परंतु ते आले नाहीत. त्यामुळे पुढच्या वेळेस विरोधकांसाठी पान सुपारीचा कार्यक्रम ठेवण्याचा आमचा विचार आहे.

 Ajit Pawar
Dombivali News : बाह्यवळण रस्ते प्रकल्पातील जमीन धारकांना चार पट टीडीआर मिळावा - दीपेश म्हात्रे

अजित पवार पुढे म्हणाले, विदर्भात कापूस, सोयाबीन, तूर, संत्रा यांचं मोठे नुकसान झालेलं आहे. आपण १ लाख २० हजार कोटींचं कर्ज काढू शकतो, जो रेशो केंद्र सरकारने ठरवून दिलेला आहे त्याप्रमाणे एवढं कर्ज काढता येतं. असं असलं तरी ८० हजार कोटी कर्ज काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. २०१३ मध्ये जीएसडीपीचं प्रमाण १६.३३ इतकं होतं. २०२३-२४मध्ये ते ३८ लाख कोटी होणार आहे. ही मोठी उपलब्धी असल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

 Ajit Pawar
ASK SRK: "पीआर टीममुळे तुझे टुकार सिनेमे ब्लॉकबस्टर झाले..." नेटकऱ्याने घेतला पंगा तर किंग खाननेही दाखवला इंगा!

मुख्यमंत्री काय म्हणाले?

  • विरोधकांचा विश्वास न्यायालय, सरकार, संस्था आणि पत्रकारांवरही नाही

  • आवसान गळालेला विरोधी पक्ष दिसून येत आहे

  • विरोधकांनी दिलेल्या पत्रावर २३ लोकांची नावं आणि सात जणांच्या सह्या होत्या. पत्रकार परिषदेत तिघे लोक झोपलेले होते.

  • दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी अगोदर स्वतःकडे बघितलं पाहिजे

  • आमच्या सरकारचं हे दुसरं हिवाळी अधिवेशन आहे

  • तीन राज्यांमध्ये भाजपचं सरकार आलेलं आहे आणि महाराष्ट्रातही चांगलं वातावरण आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com