शाळांवरून वादाची घंटा; मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

शाळा सुरू करण्याचा निर्णय कोणत्या निकषांवर घेतला याविषयीची सविस्तर माहिती कोरोना टास्क फोर्सला शिक्षण विभागाने दिली
शाळांवरून वादाची घंटा
शाळांवरून वादाची घंटाsakal
Updated on

मुंबई : राज्यात कोरोनामुक्त (corona) भागांतील शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर शालेय विभाग तूर्तास ठाम असला तरीसुद्धा आरोग्य विभागाने या निर्णयाला विरोध केल्याने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाळा सुरू केल्या जाव्यात यासाठी शालेय विभागाने बालरोग तज्ज्ञ आणि बालमानसोपचार तज्ज्ञांसोबत चर्चा केली असून कोरोना मुक्त भागांतील शाळा सुरू केल्या जाव्यात असे मत त्यांनी नोंदविलेले आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय कोणत्या निकषांवर घेतला याविषयीची सविस्तर माहिती कोरोना टास्क फोर्सला (corona task force) शिक्षण विभागाने दिली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav tackeray) हे याबाबत दोन्ही विभागांसोबत चर्चा करून निर्णय घेतील. (Maharashtra govt rethinks plan to reopen schools as Covid-19 task force not in favour)

शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत सबंधित विभागाने निर्णय घ्यावे असे निर्देश २ ऑगस्ट रोजीच देण्यात आले होते. शालेय विभागाने त्यानंतर कोरोना मुक्त शहरी भागांतील इयत्ता आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागांतील पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच शाळा सुरू करण्याचा निर्णयही स्थानिक प्रशासनाने घेण्याची मुभाही देण्यात आली होती.

काळजी घ्यावी लागणार

बालरोग टास्क फोर्सने इंडोनेशियामध्ये मोठ्या संख्येने मुले कोरोनाबाधित झालेली आहेत तर इतर राज्यांतही लहान मुलांना कोरोनाचा धोका वाढला असल्याने महाराष्ट्रात काळजी घ्यावी लागेल अशी सूचना केली आहे. शिवाय लहान मुलांसाठी औषध पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही आणि लहान मुलांचे लसीकरणसुद्धा झालेले नाही त्यामुळे शाळा सुरू केल्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे शाळा सुरू करताना सरकारने काळजी घ्यावा असे मत टास्क फोर्सने नोंदविले आहे. त्यामुळे १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय तूर्तास तरी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

शाळांवरून वादाची घंटा
'प्राध्यापकांच्या जागा भरणार' : उदय सामंत

मार्गदर्शक सूचना

शालेय शिक्षण विभागाने १० ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढला होता. यामध्ये राज्यातील शहरी भागांत आठवी ते बारावीच्या तसेच ग्रामीण भागांतील पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. यादरम्यान कोल्हापूर, सांगली, सातारा,सोलापूर, पुणे, नगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांत कोरोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचा अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला होता.

शाळांवरून वादाची घंटा
राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच जातीय अस्मितांना मिळालं बळ - राज ठाकरे

"राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही. याबाबत एक ठाम निर्णय सरकारने जाहीर करावा. मंत्री वेगवेगळ्या घोषणा करून मोकळे होतात आणि टास्क फोर्स काहीतरी वेगळ्याच भूमिकेत आहे. यामध्ये विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळ उडत आहे," असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com