Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Graduate Constituency Election : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; मतदानाची तारीख, आचारसंहिता आणि निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या.
Maharashtra MLC Election 2026 Graduate Constituency

Maharashtra MLC Election 2026 Graduate Constituency

esakal

Updated on

Graduate Constituency Voting Date : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा यात समावेश असून, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 29 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्याने संबंधित मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

कोणत्या जागांसाठी निवडणूक?

महाराष्ट्रातील पाच विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागांसाठी निवडणूक होत आहे. यात औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे सतीश चव्हाण, पुणे पदवीधर मतदारसंघाचे अरुण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजीत वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगावकर यांचा समावेश आहे. या पाचही जागांसाठी आता नव्याने निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, विविध पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू होण्याची शक्यता आहे.

इतर राज्यांतही निवडणुका

महाराष्ट्रासोबत बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील विधानपरिषदेच्या जागांसाठीही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. बिहारमध्ये आठ, कर्नाटकात चार, तर उत्तर प्रदेशात ११ विधानपरिषद जागांसाठी मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com