लसीकरणाचे लक्ष्य गाठायचे असेल तर 'ही' कृती करा! महाराष्ट्राचा केंद्राला सल्ला | Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण
लसीकरणाचे लक्ष्य गाठायचे असेल तर 'ही' कृती करा! महाराष्ट्राचा केंद्राला सल्ला

जलद लसीकरणासाठी 'ही' कृती करा! महाराष्ट्राचा केंद्राला सल्ला

कोरोना (Covid-19) विषाणूविरुद्ध लसीकरणाचा (Covid-19 Vaccine) वेग वाढवण्यासाठी आणि लक्ष्य पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra) केंद्र सरकारला (Central Government) दोन डोसमधील अंतर कमी करण्याची कल्पना सुचवली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत 91.44 दशलक्ष लोकसंख्येचे 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राला कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा विचार करण्यास सांगितले आहे; जेणेकरून यामुळे लसीकरण जलद होण्यास मदत होईल.

हेही वाचा: मारुती चितमपल्ली म्हणाले, हंस हा दूध व पाणी वेगळे करत नाही, तर...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत सांगितले की, मंत्रालयाने कोविडशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा विचार करावा. या वेळी टोपे यांनी लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सुरू असलेल्या कार्यक्रमाचीही माहिती दिली. या बैठकीत इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्रीही सहभागी झाले होते.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्य सरकार 30 नोव्हेंबरपर्यंत सर्व 91.44 दशलक्ष पात्र लोकसंख्येला किमान एक डोस देण्याचे काम करत आहे. टोपे यांच्या हवाल्याने राज्य सरकारच्या निवेदनात म्हटले आहे की, कोविडशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करून लसीकरणाची गती वाढवता येऊ शकते. केंद्रीय मंत्रालयाने या सूचनेचा विचार करावा.

लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याने मिशन कवच कुंडल, मिशन युवा स्वास्थ्य यांसारखे कार्यक्रम सुरू केले आहेत. लसीकरणाबाबत नागरिकांच्या शंका दूर करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. महाराष्ट्रात गुरुवारी कोविड-19 चे 997 नवीन रुग्ण आढळले, तर 28 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या 66,21,420 झाली असून मृतांची संख्या 1,40,475 झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

हेही वाचा: पोषण ट्रॅकरच्या तांत्रिक दोषामुळे कुपोषित मुलांची माहिती चुकीची

आरोग्य विभागाने म्हटले आहे की, गेल्या 24 तासांत, 1,016 रुग्णांना संसर्गमुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले असून, महाराष्ट्रात आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 64,64,948 झाली आहे. त्यानुसार राज्यात आता उपचाराधीन रुग्णांची संख्या 12 हजार 352 झाली आहे. महाराष्ट्रात कोविड-19 मधून बरे होण्याचा दर आता 97.64 टक्के आहे, तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे.

loading image
go to top