महाराष्ट्रात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या तिप्पट - देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 23 मे 2020

हे कुठले शहाणपण?
संकटात असणाऱ्या राज्याला राजकीय रणांगण बनवणे हे कुठले शहाणपण आहे? राजकारणासाठी आयुष्य पडले आहे, आजची वेळ निर्धाराने आणि एकजुटीने लढण्याची आहे. इतिहास भाजपची आजची ही काळी कृती कधीही विसरणार नाही. एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून सत्ता मिळवण्याची धडपड करण्यापेक्षा भाजप नेत्यांनी गरीब जनतेला मदत करावी, असे आवाहन थोरात यांनी केले.

मुंबई - कोरोनाबाधितांची संख्या देशात ४.१७ टक्के आहे. मात्र, राज्यात हा आकडा तिप्पट अर्थात १२.४३ टक्के असून, मुंबईत तो त्याहून जास्त १३.१७ टक्के असल्याची आकडेवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केली. चाचणीचा दर वाढवायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ते म्हणाले की, मुंबईत दररोज १० हजार चाचण्यांची क्षमता असताना केवळ चार ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्या पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्या आहेत. एकूण चाचण्यांच्या संख्येत पॉझिटिव्ह येण्याची भारताची टक्केवारी ही ४.१७ टक्के इतकी आहे; तर महाराष्ट्राची १२.४३ टक्के आहे. यातून चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण हे देशाच्या तुलनेत राज्यात तीनपट अधिक असल्याचे दिसते. असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांचे अंगण कोणते..फडणवीस तरी अंगणात जातात का... थोरात म्हणाले, यांचा सरकारच्या बदनामीचा डाव

विमानांना परवानगी द्यावी
अनेक देशांमध्ये महाराष्ट्रीय नागरिक अडकून पडले असताना विमान उतरू देण्यास राज्य सरकार परवानगी देत नसल्याने त्यांचे मायदेशी परतणे कठीण आहे. राज्य सरकारने विमानांना परवानगी द्यावी, अशी मागणीही फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra has tripled the number of corona patients in the state devendra fadnavis